Latest

Income Tax Return फाईल करण्याचा आज शेवटचा दिवस; उद्यापासून भरावा लागणार दंड

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: इनकम टॅक्स रिटर्न फाईल (ITR) भरण्याची आज शेवट तारीख आहे. सध्या असे दिसत आहे की, लोकांच्या मागणीनुसार ही तारीख वाढविण्यात येऊ शकते. पण जर सरकारने इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख वाढवली नाही तर आजच Income Tax Return भरण्याची शेवट संधी असणार आहे.

ITR न भरल्यास द्यावा लागेल दंड

जर कोणत्याही कारणामुळे ३१ जुलैपर्यंत एखादी व्यक्ती इनकम टॅक्स रिटर्न भरू शकली नाही किंवा इनकम टॅक्स फाईल करू शकली नाही. तर त्याला इनकम टॅक्स रिटर्न भरताना किंवा फाईल करताना दंड भरावा लागणार आहे. इनकम टॅक्सच्या कायद्यानुसार ३१ जुलै, २०२२ पर्यंतच दंड आणि टॅक्सशिवाय इनकम टॅक्स रिटर्न भरता येणार आहे. ३१ जुलैनंतर इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची संधी मिळणार नाही. या तारखेनंतर इनकम टॅक्स डिपार्टमेंट टॅक्स भरणाऱ्यांविरूद्ध कारवाई देखील करू शकते. शेवटच्या तारखेनंतर टॅक्स डिपार्टमेंटकडून टॅक्स रक्कमेवर अधिकचा व्याजदर देखील लावला जावू शकतो.

किती भरावा लागणार दंड

इन्कम टॅक्स इंडियाने आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे की 31 जुलैपर्यंत आयटीआर फाइल करा आणि उशीरा भरण्यापासून दंड टाळा. म्हणजेच १ ऑगस्टपासून आयटीआर भरण्यासाठी दंड भरावा लागेल. तुमचा रिटर्न वेळेवर भरून तुम्ही हे टाळू शकता. अंतिम मुदतीनंतर ITR फाईल केल्यास दंड आकारला जाऊ शकतो. अंतिम मुदतीनंतर रिटर्न भरण्यासाठी, 5 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्नावर 1,000 रुपये विलंब शुल्क आकारले जाईल. 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नासाठी विलंब शुल्क 5,000 रुपये असेल. ही रक्कम 10,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT