Latest

अन्नपदार्थ वाया जाऊ नये, यासाठी…

Shambhuraj Pachindre

लुईस्विले : अन्नपदार्थांची नासाडी केली तर देवता रुष्ट होतात, असे धर्मग्रंथात म्हटले आहे. अन्नपदार्थ टाकू नये, त्याचे नासाडी करू नये, हा त्यामागील हेतू असू शकतो. पण भारत अन्नपदार्थांची नासाडी करण्याच्या निकषावर दुसर्‍या क्रमांकावर आहे, ही वस्तुस्थिती निश्चितच हैराण करून टाकणारी आहे. दरवर्षी भारतात थोडेथोडके नव्हे तर 92 हजार कोटी रुपयांचे अन्नपदार्थ टाकून दिले जातात, असे आकडेवारी सांगते. त्या पार्श्वभूमीवर, जॉर्जियात राहणार्‍या एका महिलेने अन्नपदार्थांची नासाडी टाळण्यासाठी काही ट्रिक सांगितल्या आहेत.

सारा बिगर्स असे या महिलेचे नाव असून अन्नपदार्थ टाकले जाऊ नयेत, यासाठी ती सातत्याने प्रयत्न करत आली आहे. मसाले फ्रीजच्या दरवाजात ठेवले जातात. पण सारा येथे मसाले न ठेवता, जे पदार्थ सर्वात लवकर खराब होऊ शकतात, ते फ्रीजच्या दरवाजात ठेवावे, असे सांगते. फळे ही खालील बॉक्समध्ये न ठेवता फ्रीज उघडल्यावर चटकन दिसतील, अशा ठिकाणी ठेवावीत, जेणेकरून ती खाण्याची इच्छा होईल, अशी तिची सूचना आहे.

भाज्या अधिक टिकू शकतात. त्यामुळे त्या आतील बाजूस चालू शकतात. त्याचप्रमाणे, पनीर, मांस आतील बाजूस चालू शकते व आवश्यकतेनुसार आपण ते काढून घेऊ शकतो, असे ती म्हणते.

SCROLL FOR NEXT