Latest

Tilak Verma Debut : 20 वर्षीय तिलक वर्माचे टीम इंडियामध्ये दणक्यात पदार्पण

रणजित गायकवाड

तोरोबा (त्रिनिदाद), पुढारी ऑनलाईन : Tilak Verma Debut : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका गुरुवारी सुरू झाली. या सामन्यात मुकेश कुमार आणि तिलक वर्मा या दोन खेळाडूंना भारताकडून पदार्पणाची संधी मिळाली. सामन्यापूर्वी कर्णधार हार्दिक पंड्याने 20 वर्षीय तिलकला तर या दौऱ्यातच कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मुकेशला युझवेंद्र चहलने कॅप दिली.

तिलक ठरला 103 क्रमांकाचा खेळाडू (Tilak Verma Debut)

तिलक वर्माने आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी उत्कृष्ट कामगिरी केली. तेव्हापासून निवडकर्त्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. अशा स्थितीत दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्याला टीम इंडियासाठी पदार्पणाची संधी मिळाली. तिलक वर्मा भारताकडून टी-20 क्रिकेट खेळणारा १०३ वा खेळाडू ठरला आहे.

IPL 2023 मध्ये धमाका (Tilak Verma Debut)

IPL 2023 मध्ये तिलकने 24.88 च्या सरासरीने आणि 164.11 च्या स्ट्राइक रेटने 343 धावा केल्या. 11 सामन्यांमध्ये तो दोनदा नाबाद राहिला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून फक्त एक अर्धशतक झळकले पण त्याने संघासाठी संकट मोचकाची भूमिका बजावली. नाबाद 84 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. 2022 हे वर्ष देखील त्याच्यासाठी चांगले गेले. त्या मोसमात त्याने 14 सामन्यांत 397 धावा केल्या होत्या आणि तो तीनदा नाबाद राहिला होता. त्या हंगामात त्याने 2 अर्धशतके फटकावली. तिलकने पदार्पणाच्या हंगामात अधिक धावा केल्या असल्या तरी दुसऱ्या हंगामात तो खेळाडू म्हणून अधिक परिपक्व दिसला.

अशी आहे टी-20 कारकीर्द (Tilak Verma Debut)

तिलक वर्मा यांची टी-20 कारकीर्द चांगली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 46 सामन्यांमध्ये त्याने 37.3 षटकात 143 च्या स्ट्राईक रेटने 1418 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 10 अर्धशतकांचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT