Latest

…म्हणून बुद्धिमान असूनही गाढव ठरले मूर्ख !

मोहन कारंडे

मुंबई : खरे तर गाढव बुद्धिमान असते; पण तरीही ते मूर्खपणाचे प्रतीक बनले आहे. याची अनेक मजेशीर कारणे आहेत. गाढव वास्तविक हट्टी आहे; तरीही त्याच्याकडून अतोनात कष्टाची कामे करून घेतली जातात… त्याला सहनशक्ती खूप आहे आणि अरुंद, खडबडीत रस्त्यावर त्याची टाप पक्की असते.

गाढवाचे कान लांब आहेत. ते मैलावरून १० दुसऱ्या गाढवाचा आवाज ऐकू शकते. त्याची स्मरणशक्ती उत्तम आहे. त्यामुळे ३० वर्षांनंतरही ते साथीदाराला ओळखू शकते. गाढव अतिसमजूतदार आहे म्हणून त्याला महामूर्ख समजले जाते. ते फारच इमानदार आणि सरळ स्वभावाचे असते. अशा स्वभावाच्या माणसांची फसवणूक सहज करता येते. त्यामुळे अशा स्वभावाच्या माणसांना गाढव म्हटले जाते. खूप कष्ट करूनही गाढवाला अन्य प्राण्यांसारखा दर्जा नाही. ते चलाख नाही. त्यामुळे भोळसर माणसांनाही गाढव म्हटले जाते. गाढव कोणत्याही वातावरणात, कोणत्याही परिस्थितीत स्वतःला अॅडजस्ट करते. यामुळेच कोणतीही तक्रार न करता आलेल्या परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या माणसांना गाढवाची उपमा दिली जाते. बुद्धिमान असूनही स्वतःच्या फायद्यासाठी बुद्धीचा वापर करत नाही म्हणून गाढव मूर्खपणाचे प्रतीक बनले आहे.

SCROLL FOR NEXT