Latest

Weather Update : राज्याच्या ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता

स्वालिया न. शिकलगार

नागपूर : पुढारी वृत्तसेवा – पूर्व-विदर्भ क्षेत्रात २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता हवामान विभागामार्फत वर्तविण्यात आली आहे. (Weather Update) रविवार, २५ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे. मुख्यत: सोमवार दि. २६ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षित आहे. (Weather Update)

या तीन जिल्ह्यांसह भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांत गारपीटाचीही शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT