Latest

हवेत गरम पाणी फेकताच होतो बर्फ!

Arun Patil

ऑस्लो : नॉर्वे हा देश अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. तेथील स्वॅलबार्डसारख्या ध्रुवीय वर्तुळालगतच्या भागात हिवाळ्यात अनेक महिने सूर्यदर्शन घडत नाही. मध्यरात्रीचा सूर्य हा ध्रुवीय परिसरातील नैसर्गिक चमत्कारही नॉर्वेमध्ये पाहायला मिळतो. ध्रुवीय वर्तुळाजवळ असल्याने नॉर्वेमध्येही आकाशात 'ऑरोरा' किंवा 'नॉर्दन लाईट्स' हा रंगीबेरंगी प्रकाशझोतांचा खेळ पाहायला मिळतो. हिवाळ्यात नॉर्वेमध्ये प्रचंड थंडी असते. आता तेथील एक छायाचित्र लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामध्ये एक व्यक्ती हवेत गरम पाणी फेकत असताना हवेतच या पाण्याचे बर्फ होत असल्याचे दिसते!

राजधानी ऑस्लोजवळ 650 किमी दूर आर्क्टिक सर्कलमध्ये येणार्‍या स्वॅलबार्डमध्ये पारा उणे 21 वर पोहोचला आहे. यामुळे तेथील नदी, तलाव आणि अन्य जलस्रोताचे बर्फाचे रूपांतर झाले आहे. हिवाळ्याची स्थिती अशी की, हवेत गरम पाणी फेकताच त्याचा बर्फ होत आहे. यादरम्यान, यूके रॉयल एअरफोर्स व नॉर्वेजियन समान आर्क्टिक सर्कलवर – 20 अंश सेल्सियसच्या थंडीत स्वत:ला जिवंत ठेवण्याचे प्रशिक्षण घेत आहे. यात हवाई दलाच्या एका तज्ज्ञ रेजिमेंटचे गनर, अभियंते, डॉक्टर, चालक आणि शेफ सहभागी झाले होते.

SCROLL FOR NEXT