Latest

पुणे: टोमॅटोने भरलेला ट्रॅक्टर आणि ट्रॉली फाट्यामध्ये पडून ३ महिला ठार, सहा जखमी

अमृता चौगुले

रावणगाव, पुढारी वृत्तसेवा: टोमॅटोची वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ट्रॉली फाट्या मध्ये पडून रावणगाव (ता. दौंड) येथे झालेल्या अपघातात तीन महिला ठार तर सहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना दौंड व भिगवण येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातातील मयत झालेल्या महिलांची नावे सुरेखा बाळू पानसरे, रेश्मा भाऊसो पानसरे,अश्विनी प्रमोद आटोळे तर इंदुबाई बाबासाहेब आटोळे, मीना बापू आटोळे,अनिता धनाजी साळुंखे, आक्का सुदाम साके, कावेरी माणिक आटोळे, उषा राजेंद्र आटोळे या महिला किरकोळ काही गंभीर जखमी अवस्थेत आहेत

गुरुवारी( दि.१३) सायंकाळी पाच वाजता टोमॅटोने भरलेला ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढत असताना खडकवासला धरण कालव्याच्या बत्तीस फाट्यामध्ये ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. संध्याकाळी पाच वाजता हा अपघात झाला. यामध्ये ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॉलीत बसून निघालेल्या महिला या ट्रॉलीखाली सापडल्या. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. टोमॅटोचे ७५ ते ८० क्रेट यामध्ये होते. टोमॅटो घेऊन ट्रॅक्टर ट्रॉलीसह शेतातून बाहेर पडताना खडकवासला कालव्याच्या ३२ व्या क्रमांकाच्या वितरीकेवरून निघाला होता. चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडला. यामध्ये रावणगाव परिसरातील बंगाल वस्तीवरील नऊ महिला होत्या. उपचारादरम्यान यापैकी तीन महिलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

मयत महिलांमध्ये दोघी सख्या जावा आहेत. सर्व महिला रोजंदारीचे काम करत होत्या. एकाच वस्तीवरील असल्याने या परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे. अपघातानंतर ग्रामस्थांनी जे.सी.बी मशीनच्या साह्याने एक तासाभरानंतर ट्रॅक्टर ट्रॉली खालून त्यांना काढण्यात आले

SCROLL FOR NEXT