Latest

पुणे : रांजणीत उसतोड करताना आढळले तीन बिबट बछडे

अमृता चौगुले

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : रांजणी (ता. आंबेगाव) येथील कारमाळा नजीक धुमाळ वस्तीत ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. त्यापैकी दोन बछडे मृत आहेत तर एक जिवंत आहे. ही घटना शनिवारी (दि. १८) सकाळी आठ वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे ऊसतोड कामगारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

धुमाळवस्तीत भरत हारकू वाघ यांच्या शेतात शुक्रवार (दि. १७) पासून ऊस तोडणीचे काम सुरू आहे. शनिवारी सकाळीच ऊसतोड कामगार उसतोडणीसाठी शेतात दाखल झाले. उसतोडणीचे काम सुरु झाल्यानंतर आठ वाजण्याच्या सुमारास तीन बिबट बछडे उसतोडणी कामगारांना दिसले. यामुळे एकच घबराट उडाली. तीनपैकी दोन बछडे हे मृत आहेत, तर एक बछडा जिवंत आहे.

स्थानिक शेतकरी रमेश सरदार भोर व निलेश कानसकर यांनी घटनेची खबर वनविभागाला दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी वनपाल प्रदीप कासारेे, वनरक्षक सूर्यकांत कदम, वन कर्मचारी महेश टेमगिरे यांना सूचना दिल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT