Latest

इचलकरंजी : ८६ लाखांची लूट करणार्‍या तिघांना अटक

backup backup

इचलकरंजी ; पुढारी वृत्तसेवा : झटपट श्रीमंत होण्यासाठी आणि चैनीसाठी बनावट सिमकार्ड तयार करून इंटरनेट बँकिंगद्वारे इचलकरंजी येथील व्यापार्‍याची 86 लाख रुपयांची लूट करणार्‍या मध्यप्रदेश येथील टोळीचा पर्दाफाश कोल्हापूर पोलिसांच्या सायबर सेलच्या वतीने करण्यात आला.

योगेंद्रसिंह ऊर्फ हनी कृष्णपालसिंह राजपूत (वय 24), धैर्य ऊर्फ अंश मनोजकुमार दुबे (वय 19, दोघे रा. कालिंदी सिटी, मध्यप्रदेश) आणि पवन ब्रजनारायण कुशवाह (वय 22, रा. महाराणा प्रताप नगर, इंदोर, मध्यप्रदेश) या तिघांना अटक करण्यात आली.

या कारवाईत संशयितांकडून गुन्ह्यातील रकमेतून खरेदी केलेली टाटा सफारी मोटार, 1 लाख रुपये किमतीचे मोबाईल असा सुमारे 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा अद्याप शोध लागलेला नाही.

इचलकरंजी येथील व्यापारी प्रमोदकुमार सोमाणी व त्यांच्या कुटुंबीयांच्या विष्णू इंटरनॅशनल, बजरंगलाल सोमाणी आणि रामदेव मदनलाल मंत्री हे ऑनलाईन आर्थिक व्यवहार करण्यासाठी नेट बँकिंग वापरत होते. संशयितांनी मोबाईल क्रमांकाचे सिमकार्ड बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेला सुट्टी असल्याचा फायदा घेऊन तिन्ही बँक अकौंटमधील 86 लाख 10 हजार रुपये लांबवले.

सायबर सेलचे पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे व पथकाकडून संशयितांना अटक केली. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT