Latest

Threatening Message To CM Shinde: मुख्यमंत्री शिंदे पिता-पुत्रांना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्या अज्ञाताला पुण्यात अटक; गुन्हा दाखल

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली. संबंधित प्रकरणात संशयित आरोपीने सोशल मीडियावरून मुख्यमंत्री शिंदे पिता-पुत्रांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. असे वृत्त 'ANI' वृत्तसंस्थेने दिले आहे. (Threatening Message To CM Shinde)

वृत्तात पुढे म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर कलम ५०६(२) आणि ५०५(१)(बी) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू असल्याचेही मुंबई गुन्हे शाखेने 'एएनआय'ला दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Threatening Message To CM Shinde)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT