Latest

UP Election : “जे हिंदू मला मत देणार नाहीत, त्यांच्या धमण्यांमध्ये मुस्लीम रक्त”, भाजपा आमदाराचं वक्तव्य

backup backup

लखनऊ, पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशच्या डुमरियागंज विधानसभा मतदारसंघातून लढत असणारे भाजपाचे उमेदवार राघवेंद्र प्रताप सिंह यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये राघवेंद्र म्हणताहेत की, "जे हिंदू मला मत देणार नाहीत, त्यांच्या धमण्यांमध्ये मुस्लीम रक्त आहे", असं वादग्रस्त विधान पाच दिवसांपूर्वी केल्याचं संबंधित भाजपा आमदाराने मान्य केलेलं आहे.

भाजपाचे आमदार राघवेंद्र प्रताप सिंह म्हणतात की, "मी हे विधान पाच दिवसांपूर्वी केलं होतं. ते मी नाकारत नाही. पण, त्याचा संदर्भ वेगळा होता. ते एक उदाहरण होतं. मी ते विधान भूतकाळाशी संबंधित केलेलं आहे. या विधानातून कुणाला धमकी देण्याचा कोणताही मनसुबा आमचा नव्हता", असं स्पष्टीकरण भाजपाच्या आमदाराने दिलेलं आहे.

"डुमरियागंजमध्ये मतदारांना धमकी देऊन उमेदवार निवडून येऊ शकतो का? जिथं १.७३ लाख मुस्लीम जनता आहे, जवळजवळ ३९.८ टक्के मुस्लिमांची संख्या आहे. मला सांगा कुठला मुसलमान मला मत देईल? तर लक्षात घ्या की, या गावातील हिंदू दुसऱ्या पक्षाचं समर्थन करत असतील, तर त्यांच्यात मुस्लीम रक्त आहे. ते देशद्रोही आहेत. पुन्हा एकदा इशारा देतो की, जर तुम्ही माझा अपमान केला किंवा माझ्याशी गद्दारी केली तर मी एकवेळ सहन करेन. पण, हिंदू समाजाला अपमानित करण्याचा प्रयत्न केला तर मात्र तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकेन", अशी खुली धमकी त्यांनी दिली आहे.

आपल्या वादग्रस्त विधानाची व्याख्या करताना सिंह म्हणाले की, "हे बरोबर आहे. जर एक हिंदू मुलगी एका मुस्लीम मुलासोबत पळून जाते आणि हिंदू त्या मुलाच्या बाजुने मध्यस्ती करत आहे, या संदर्भात मी ते विधान केलं आहे. मला वाटतं की, माझं संपूर्ण भाषण असं नव्हतं. लोक माझ्या भाषणातील काही शब्द बाजुला करून काही शब्दांना जोडतात." डुमरियागंज हे भाजपा आमदार हिंदू युवा वाहिनीचे प्रभारी आहेत. ते ३ मार्च रोजी आपल्या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवत आहेत.

पहा व्हिडिओ : ब्रेक-अप मधून कसं सावरावं ? जाणून घेऊया मानसोपचार तज्ज्ञांकडून…

SCROLL FOR NEXT