Latest

यंदाच्या आयपीएलची पहिली हॅटट्रीक ‘या’ खेळाडूच्या नावावर

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२३ मधील पहिली हॅटट्रिक गुजरात टायटन्सच्या राशिद खानने केली. त्‍याने केकेआर विरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली. गुजरातने कोलकाता समोर २०५ धावांचे आव्हान ठेवले. यानंतर शेवटच्या ५ षटकांमध्ये ६० धावांची गरज असताना आंद्रे रसेल आणि सुनिल नारायण क्रिजवर होते. राशिद खानने १७ व्या षटकात आपल्या फिरकीची जादू चालवली आणि हॅटट्रीक पटकावली.

 रिंकूचा 'चमत्‍कार', गुजरातला धोबीपछाड,अखेरचा षटकात 'केकेआर'ने मारली बाजी

अखेरच्या षटकात तब्बल ५ षटकार फटकावत रिंकू सिंगने केकेआरला अविस्मरणीय विजय मिळवून दिला.  अखेरच्या षटकात केकेआरला विजयासाठी २८ धावांची गरज होती. तर गुजरातला ३ विकेट्स हव्या होत्या. टी-20 क्रिकेटमध्‍ये होणारा चमत्‍कार या सामन्यात क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाला. अखेरच्‍या षटकातील पहिल्‍या चेंडूवर एक धाव झाली. यावेळी केकेआरसाठी विजय स्‍वप्‍नवत वाटत होता. मात्र रिंकू सिंगने  ५ चेंडूत ५ षटकार लगावत अशक्य वाटणारा विजय शक्‍य केला.

केकेआरसमोर होते २०४ धावांचे लक्ष्‍य

तत्पूर्वी, साई सुदर्शनची ३८ चेंडूमध्ये ५३ धावांची अर्धशतकी खेळी, शुभमन गिलच्या ३१ चेंडूमध्ये ३८ धावा आणि विजय शंकरच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने २०४ धावा केल्या. गुजरातच्या ९ षटकानंतर ८३ धावा होत्या. मात्र, विजय शंकरने शेवटच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीने गुजरातने कोलकातासमोर २०५ धावांचे आव्हान ठेवले. कोलकाताकडून सुनील नारायणने ३ विकेट्स तर सुयश शर्माने १ विकेट पटकावली.

केकेआरने व्यंकटेश अय्यरने ४० चेंडूमध्ये ८३ धावा, रिंकू राजगुरूने २९ चेंडूमध्ये ४५ धावा केल्या. शिवाय रिंकू सिंगच्या निर्णायक २१ चेंडूमध्ये ४८ धावांच्या जोरावर गुजरातचे २०५ धावांचे आव्हान गाठले. गुजरातकडून राशिद खानने हॅटट्रीक पटकावली. मात्र, ती व्यर्थ ठरली आहे.

SCROLL FOR NEXT