Latest

‘या’ डाळींमुळे दूर होते थकव्याची समस्या

Arun Patil

नवी दिल्ली : वेळी-अवेळी खाणे, फास्ट फूडचे अतिप्रमाणात सेवन यामुळं अनेक आजार जडण्याची शक्यता असते. पौष्टिक अन्नाची शरीराची कमतरता भासल्यास त्याचे परिणामही लगेच दिसायला लागतात. आरोग्यास योग्य नसलेले जेवण किंवा पदार्थ खाल्ल्याने हृदय कमजोर होण्यास सुरुवात होते. अशावेळी थोडेसे चालले तरीही दम लागतो. अशावेळी तुमचे हृदय नाजूक झाले आहे हा संकेत मिळतो.

हृदयरोगाचे आजार टाळण्यासाठी 'हेल्दी डाएट' घेण्याची गरज आहे. ब्रिटिश हेल्थ फाऊंडेशनच्या मते आहारात विविध डाळींचा समावेश करावा. डाळींमध्ये पुरेसे प्रोटिन उपलब्ध असते. यात फायबर आणि लो फॅटदेखील असते. यामुळंच हृदय मजबूत ठेवण्यासाठी डाळी हा सर्वोत्तम पर्याय आहे. तीन प्रकारच्या डाळी यासाठी अधिक लाभदायक ठरतात असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

मसूरडाळ : डाळी या एकप्रकारे बियाच असतात. त्यामुळं बियांमध्ये सर्व आवश्यक गोष्टी डाळींमध्ये उपलब्ध असतात. डाळींमध्ये मसुराची डाळ सर्वात पौष्टिक आणि शक्तिवर्धक असते. मसुराच्या डाळीत पोषक तत्त्वांचा खजिना असते. मसूर डाळीत अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडेंटस् असतात. मसुरीच्या डाळीत कॅल्शियम आणि डायट्री फायबरची पुरेशी मात्रा असते. त्यामुळे मसुराची डाळ हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी करते.

तूरडाळ : तुरीच्या डाळीत पुरेसे अ‍ॅमिनो अ‍ॅसिड आढळते. अ‍ॅमिनो अ‍ॅसिडमध्ये प्रोटिन आढळले जाते. शरीराला रोज अ‍ॅमिनो अ‍ॅसिडची गरज भासते. खासकरून हृदयाला. तुरीच्या डाळीतील घटक हृदयाचे मसल्स मजबूत करतात.

उडदाची डाळ : उडदाची डाळ खूपच पौष्टिक मानली जाते. खूप जण उडदाच्या डाळीचे वरण मोठ्या आवडीने खातात. या डाळीत सॉल्यूबल डायट्री फायबर असते, जे हृदयासाठी चांगले मानले जाते. उडदाच्या डाळीचे सेवन केल्यामुळं चेहर्‍यावर ग्लो येतो आणि रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT