Latest

Healthy Diet : वयाच्या तिशीनंतर ‘हा’ आहार ठरतो उपयुक्त

Arun Patil

नवी दिल्ली : आरोग्य हे बर्‍याच अंशी आपल्या आहारावर Healthy Diet अवलंबून असते. वयाच्या तिशीनंतर, पुरुष असो किंवा महिला, प्रत्येकाची हाडे कमकुवत होऊ लागतात. एवढेच नाही तर शरीराच्या अवयवांची काम करण्याची शक्तीही कमकुवत होऊ लागते. वयाच्या 30 वर्षांनंतर तुमच्या शरीरात बदल दिसू लागतात. एवढेच नाही तर, वयाच्या तिशीनंतर खाण्यापिण्याची योग्य काळजी घेतली नाही तर आपल्या शरीरात प्रथिने, जीवनसत्त्वे, फायबर, कॅल्शियम आणि लोहाची कमतरता निर्माण होते. त्यामुळे अंधुक द़ृष्टी, गुडघेदुखी अशा समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आहाराकडे अधिक गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असते.

आहारतज्ज्ञांनी म्हटले आहे की वाढत्या वयानुसार, तुम्ही अधिक फायबरयुक्त पदार्थांचे Healthy Diet सेवन केले पाहिजे, जे तुमचे चयापचय मजबूत ठेवण्यास मदत करते आणि नंतर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवते. हे रक्तातील साखरेची पातळी राखण्यासदेखील मदत करते आणि भरपूर फायबर वजन नियंत्रित ठेवते. या वयात हार्मोनल असंतुलनाची समस्या झपाट्याने वाढते, त्यामुळे ती नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी अश्वगंधा, तुळशी, ब्रोकोली, ग्रीन-टी, सफरचंद, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, ब्लू बेरी यासारख्या गोष्टींचा वापर करावा. या

वयात स्त्रियांमध्ये एक सामान्य समस्या म्हणजे लोहाची कमतरता. ज्यामुळे काही काम करूनही त्यांना थकवा जाणवतो. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे हा अशक्तपणा सुरू होतो. यापासून बचाव करण्यासाठी आपण हिरव्या भाज्या, वाटाणे, भोपळ्याच्या बिया, मनुके, गूळ, बीटरूट, गाजर इत्यादी लोहयुक्त पदार्थांचे Healthy Diet सेवन केले पाहिजे. गर्भवती महिलांनी हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, पालक, मेथी आणि लिंबूवर्गीय फळे आपल्या आहार योजनेचा भाग बनवणे आवश्यक आहे. वाढत्या वयाबरोबर आपली हाडे कमकुवत होऊ लागतात, त्यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता होते. यासाठी तुम्ही दूध, दही, चीज, बदाम, ब्रोकोली इत्यादी गोष्टी आहारात समाविष्ट कराव्यात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT