Latest

Vegetables Beneficial : आरोग्यासाठी ‘या’ भाज्या गुणकारी

Arun Patil

भाज्या खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, हे आपल्याला ठाऊक आहेच. अनेक प्रकारच्या भाज्यांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि रोगांपासून आपण दूर राहतो. भाज्या केवळ आपले शरीर निरोगी ठेवत नाहीत, तर त्याचे अन्यही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. असे म्हणता येईल की, भाज्या आपल्या शरीरासाठी एक प्रकारचे औषध आहेत.

तुम्ही नियमितपणे भाज्या खाल्ल्या तर विविध शारीरिक समस्यांपासूनही दूर राहू शकता. भाज्यांचा आहारामध्ये समावेश केल्याने लठ्ठपणा, हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार या समस्या आपल्यापासून चार हात दूर राहतात. नेमक्या कोणत्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया..!

1. मटार हे मुळात एक फळ आहे. त्यात भरपूर प्रथिने असतात; पण विशेषतः मधुमेहींसाठी फायदेशीर आहे. रोज नाश्त्यात वाटाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यासोबत आपण आहारामध्ये मटारच्या भाजीचादेखील समावेश करू शकतो.

2. वांग्याची भाजी खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बरेच लोक वांग्याची भाजी म्हटलं की, नाक मुरडतात; मात्र वांग्याच्या भाजीचा आपल्या आहारामध्ये समावेश असावा. वांग्यात अनेक आरोग्यदायी घटक असतात. वांग्यात जीवनसत्त्वे अ, क आणि पॉलिफेनॉल असते.

3. कारले खायला आवडणार्‍यांची संख्या फारच कमी आहे. घरामध्ये कारल्याची भाजी म्हटले की, कोणालाही आनंद होत नाही. मात्र, हेच कारले खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. कारल्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

4. निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये सिमला मिरचीचादेखील नक्की समावेश करावा. लाल, हिरवी आणि पिवळी सिमला मिरची फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी असते. हे हृदयासाठी चांगलेच नाही, तर वजन कमी करण्यासही मदत करते. यामुळे सिमला मिरचीचा आहारामध्ये समावेश करा.

SCROLL FOR NEXT