Latest

ODI Asia Cup : ‘हे’ आहेत सर्वाधिक ‘षटकार’ ठोकणारे 5 फलंदाज

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ODI Asia Cup : आशिया चषक स्पर्धेला सुरू होण्यास अवघे काही तास शिल्क आहेत. पहिला सामना बुधवारी (30 ऑगस्ट) पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. भारतीय संघ 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. हा महामुकाबला पाहण्यासाठी जगभरातील चाहते उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत या बातमीच्या माध्यमातून आशिया चषक स्पर्धेच्या वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांबद्दल जाणून घेऊया.

आशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक षटकार (ODI Asia Cup)

1. शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) : 26 षटकार

आशिया कपच्या (Asia Cup 2023) वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. त्याने 23 सामन्यात 26 षटकार ठोकले आहेत. यादरम्यान त्याने 2 शतके आणि एका अर्धशतकासह एकूण 532 धावा केल्या.

2. सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) : 23 षटकार

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा सनथ जयसूर्या आहे, ज्याने 25 सामन्यांमध्ये 23 षटकार आणि 139 चौकार मारले आहेत. जयसूर्याने आशिया कपमध्ये एकूण 1220 धावा केल्या ज्यात 6 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.

3. सुरेश रैना : 18 षटकार

तिसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाचे नाव आहे. त्याने 13 सामन्यात 18 षटकार खेचले आहेत. या कालावधीत रैनाने 547 धावा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. यादरम्यान त्याने दोन शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत.

4. रोहित शर्मा : 17 षटकार

भारताचा कर्णधार रोहित शर्माचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण 17 षटकार आणि 60 चौकार मारले आहेत. आशिया कपमध्ये 22 सामने खेळताना रोहितने एक शतक आणि पाच अर्धशतकांसह एकूण 745 धावा केल्या आहेत.

5. सौरव गांगुली : 13 षटकार

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचे पाचव्या क्रमांकावर आहे. दादाने आशिया कपमध्ये एकूण 13 षटकार आणि 44 चौकार लगावले. या कालावधीत त्याने 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 518 धावा केल्या. (ODI Asia Cup)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT