Latest

Weather Update : थंडी कायम ! जळगाव 10.5, तर पुणे 13.6 अंशांवर

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतातील झोतवार्‍याच्या प्रभावामुळे अजूनही किमान तापमान 4 ते 7 अंशांवर आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम आहे. मंगळवारी जळगाचे तापमान 10.5 अंशांवर होते. हिमालयात पश्चिमी चक्रवात जोरदार सक्रिय झाल्याने त्या भागात हिमवर्षाव सुरू झाला आहे. त्यामुळे काश्मीरपासून पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशपर्यंतची सर्व राज्ये अजूनही गारठलेली आहेत.

या भागात झोतवारा ताशी 140 कि.मी वेगाने हवेच्या वरच्या थरात वाहत आहे. त्यामुळे दाट धुके व थंडीने उत्तर भारतात हाहाकार निर्माण केला आहे. या प्रभाव महाराष्ट्रावर होत असून कोकण व मध्य महाराष्ट्र वगळता उत्तर महाराष्ट्र, विदर्भ अन् मराठवाड्यात थंडीचा प्रभाव कायम आहे. दरम्यान 1 फेब्रुवारी रोजी विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

SCROLL FOR NEXT