Latest

कोविड सेंटरमध्ये घोटाळा नसल्याचे सांगत अनिल देशमुखांची ईडी कार्यालयात हजेरी

स्वालिया न. शिकलगार

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क – कोरोना काळातील तथाकथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणामध्ये कोणताही आर्थिक घोटाळा झालेला नाही, अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. कोविड सेंटर प्रकरणामध्ये गैरव्यवहार झाल्याने ईडीकडून चौकशी सुरू आहे. अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यापासून २ महिने त्यांनी ईडी कार्यालयात हजेरी लावणे आवश्यक आहे. कोर्टाच्या आदेशानुसार, देशमुख हे आज ईडीच्या कार्यालयात हजेरीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

कोविड सेंटर प्रकरणामध्ये गैरव्यवहार झाल्याने ईडीकडून चौकशी आहे. उपकरणांच्या खरेदीसहीत आणखी काही घोटाळे झाल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी केला होता. यावर बोलताना अनिल देशमुख म्हणाले-आम्ही आमच्या काळात जे काही कंत्राटे मंजूर केली होती, त्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. कायदेशीर पूर्तता करूनचं कंत्राटे दिली गेली. यामध्ये आर्थिक घोटाळा झालेला नाही.

इक्बालसिंह चहल ईडी कार्यालयात दाखल

मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल ईडी कार्यालयात दाखल आहेत. ईडी चौकशीला जाण्याआधी चहल यांची बैठक अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. मनपा प्रशासनाची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने त्यांना पूर्ण जबाबदारीने आणि कर्तव्याने पालिकेचे कामकाज पहावे लागत आहे.

कोरोना काळात कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. इक्बाल सिंह चहल यांना ईडीने नोटीस पाठवली होती. त्यांना चौकशीसाठी सोमवारी हजर राहण्याचा समन्स ईडीने बजावला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT