Latest

Dilip Vengsarkar : तेव्हा धोनीला कोहली संघातच नको होता वेंगसरकर यांचा गौप्यस्फोट

Shambhuraj Pachindre

मुंबई; वृत्तसंस्था : महेंद्रसिंग धोनीला विराट कोहली भारतीय संघात नको होता, असा खळबळजनक दावा त्यावेळचे निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी केला आहे. (Dilip Vengsarkar)

वेंगसरकर यांनी सांगितले की, भारतीय संघ श्रीलंकेच्या दौर्‍यावर जाणारा होता. त्यावेळी कोहलीने 2008 साली युवा विश्वचषकात दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे मला त्याला संघात स्थान द्यायचे होते. धोनीला मात्र तो संघात नको होता. एवढेच नव्हे तर चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन. श्रीनिवासन यांनाही कोहली संघात नको होता. धोनी आणि श्रीनिवासन यांना चेन्नई सुपर किंग्जच्या एस. बद्रिनाथला संघात स्थान द्यायचे होते. मात्र, त्याला संघात स्थान न दिल्यामुळे ते आणि धोनी नाराज झाले होते. (Dilip Vengsarkar)

हेही वाचा; 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT