Latest

एमक्युअर फार्मासुटीकल कंपनीतून ३० लाख रूपयांची केमिकल पावडर चोरी

अमृता चौगुले

कुरकुंभ, पुढारी वृत्तसेवा: दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीतील एमक्युअर फार्मासुटीकल कंपनीतून पुन्हा एकदा ३० लाख रूपयांची केमिकल पावडर चोरी झाली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेंजर (एच. आर. डिपार्टमेंट) राहुल हनुमंत मोरगांवकर (वय ५२, रा. मल्हार अपार्टमेंट, शालीमार चौक दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.

हा प्रकार १६ ते २२ जुलै २०२२ दरम्यान घडला. या कंपनीतील मागील ५ महिन्यातील हि दुसरी केमिकल चोरीची घटना आहे. यापूर्वी २८ मार्च २०२२ रोजी १२ लाख ५४ हजार ९४७ किमतीचे केमिकल चोरी झाले होते. या चोरीचा अद्याप तपास लागलेला नसताना पुन्हा चोरी झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT