Latest

जगातील सर्वात छोटू बॉडीबिल्डरला मिळाली नवरी; रायगडच्या प्रतीकची वधू पुण्याची

अमृता चौगुले

रायगड/पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील रायगडचा प्रतीक मोहिते (वय 28) याची उंची केवळ 3.3 फूट आहे, जगातील सर्वात बुटका बॉडीबिल्डर म्हणून त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. प्रतीकने स्वतःसाठी नवरी शोधली आणि लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

प्रतीकची वधू पुण्याची आहे. प्रतीकची उंची 3 फूट 34 इंच आहे, तर जयाची उंची 4 फूट 2 इंच आहे. चार वर्षांपूर्वी वडिलांनी जयाशी ओळख करून दिली होती. प्रतीक आणि जया 2018 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. प्रतीकने 2016 मध्येच शरीरसौष्ठवात भाग्य आजमावणे सुरू केले होते. आज प्रतीक एक व्यावसायिक फिटनेस ट्रेनर आहे. सेटल झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे त्याने जयाशी शुभमंगल केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT