Latest

kiss in water : चक्क पाण्यात किस करण्याचा विश्वविक्रम

Arun Patil

जोहान्सबर्ग : गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये वेगवेगळ्या विक्रमांची नोंद सातत्याने केली जाते. आता 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने एका जोडप्याने चक्क पाण्यामध्ये परस्परांना किस (kiss in water) करून नव्या जागतिक विक्रमांची नोंद केली आहे.

माईल्स क्लाऊटियर (कॅनडा) आणि बेथ नीले (दक्षिण आफ्रिका) अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्या या रेकॉर्डची नोंद गिनिज बुकमध्ये झाली आहे. एका स्विमिंग पूलमध्ये त्यांनी 4 मिनिटे 6 सेकंद एकमेकांना किस (kiss in water) केले. यापूर्वीचा विक्रम 13 वर्षांपूर्वी इटालियन जोडप्याच्या नावावार होता. त्यांनी पाण्यात 3 मिनिटे 24 सेकंद किस केले होते. माईल्स आणि बेथ हे दोघेही डायव्हर्स आहेत. त्यांना दीड वर्षाची मुलगी आहे. तिघेही दक्षिण आफ्रिकेत राहतात.

गिनिज बुकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून माईल्स आणि बेथ यांच्या नव्या विक्रमाची माहिती दिली आहे. 'व्हॅलेंटाईन-डे'ला हा रेकॉर्ड (kiss in water) नोंदविण्यात आला, असे या पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे. तसेच त्यात माईल्स आणि बेथ यांचा फोटोदेखील शेअर करण्यात आला आहे. तब्बल 9.9 लाख लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. बेथने सांगितले, रेकॉर्ड करण्याच्या तीन दिवस आधी मला श्वासावर नियंत्रण ठेवता येत नव्हते.

नव्या विक्रमाची नोंद करण्यापूर्वी सकाळी 7.30 वाजता माईल्स आणि बेथ यांनी अंडर वॉटर किससाठी वॉर्मअप केले. आधी दोन आणि नंतर तीन मिनिटांच्या प्रॅक्टिसनंतर त्यांनी किस (kiss in water) करण्यास सुरुवात केली. गिनिज बुकच्या टीमने या विक्रमाची सत्यता पडताळण्यासाठी खास व्हिडीओग्राफची व्यवस्था केली होती. तसेच या जोडप्याच्या विक्रमात कसलाही व्यत्यय येणार नाही, याचीही दक्षता घेण्यात आली होती. जेव्हा हा अनोखा विक्रम नोंदला गेला तेव्हा या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव जगभरातून करण्यात आला. बेथ ही तिच्या डायव्हिंगचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिला हजारो नेटकरी फॉलो करतात. कारण, नेहमीच तिच्या पोस्ट नेटकर्‍यांचे लक्ष वेधतात.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT