Latest

ग्रहांवरील टर्मिनेटर झोनने वाढविली जीवनाची आशा

Arun Patil

वॉशिंग्टन : जगभरातील तमाम खगोल शास्त्रज्ञांनी पृथ्वीबाहेरील जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या हाती निराशाच पडली आहे. कारण शोधलेले बहुतेक ग्रह त्यांच्या तार्‍यांजवळ असून तेथील तापमान खूप जास्त किंवा खूप कमी आहे. मात्र, या संदर्भातील नव्या अभ्यासात ग्रहांचे विशेष क्षेत्र असलेल्या टर्मिनेटर झोनने आशा वाढवल्या आहेत.

खगोलशास्त्रज्ञ पृथ्वीबाहेरील जीवनाचा शोध घेण्यासाठी पृथ्वीबाहेरचा अभ्यास करतात, तेव्हा त्यांच्यासमोर पृथ्वीसारखी आदर्श म्हणून जीवनास योग्य असणारी परिस्थिती असते. यावेळी ते तार्‍यापासून पुरेसे अंतर (ज्याला गोल्डीलॉक्स अंतर म्हणतात), तापमानाची श्रेणी, खडकाळ पृष्ठभागाची उपस्थिती इत्यादी घटक शोधतात.

विशेष टर्मिनेटर झोन म्हणजे ग्रहांवर असे काही भाग असतात की, तिथे नेहमी पहाटे किंवा संध्याकाळसारखे वातावरण असते. अशा ठिकाणचे तापमान नियंत्रित स्थितीत असू शकते म्हणजे खूप जास्त किंवा खूप थंडही नाही. या भागांना सायंटिफिक टर्मिनेटर झोन म्हणतात आणि इथेच शास्त्रज्ञांना जीवनाचे संकेत मिळण्याची शक्यता बळावली आहे.

आतापर्यंत शोधलेल्या 5,000 हून अधिक ग्रहांपैकी एकामध्ये असे काहीच पुरावे मिळाले नाहीत की, तेथे जीवनाचे अस्तित्व असू शकते. असे संकेत मिळाले तर पूर्वी जीवन होते किंवा भविष्यात कधीतरी अस्तित्वात येईल, अशी आशा निर्माण होते. आजपर्यंत असे काहीच घडले नाही, पण नव्या अभ्यासाते या ग्रहांवर सध्या असलेल्या टर्मिनेटर झोन नावाच्या विशेष क्षेत्रांबद्दल नमूद आले असून तेथे जीवनाची अनुकूलता असू शकते.

तसे पाहिल्यास आजपर्यंत पृथ्वीसारखा कोणताही ग्रह सापडलेला नाही. ज्याची रचना, आकार आणि इतर वैशिष्ट्ये आपल्या पृथ्वीसारखी आहेत. आतापर्यंत सापडलेले 5300 असे ग्रह असे आहेत की ते त्यांच्या तार्‍याच्या अगदी जवळ आहेत, त्यामुळे ते त्यांच्या अक्षाभोवती फिरत नाहीत. म्हणजेच एका बाजूला नेहमी दिवस असतो आणि दुसर्‍या बाजूला नेहमी रात्र असते. यामुळे या ग्रहांची बाजू नेहमीच खूप उष्ण असते आणि तार्‍याच्या मागची बाजू खूप थंड असते, त्यामुळे तिथे पृथ्वीसारखे जीवन असण्याची अपेक्षा करण्यात काही अर्थच नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT