पुढारी ऑनलाईन डेस्क
जगभरात ओमायक्रॉन रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या सर्व क्षेत्रात पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. ओमायक्रॉनचे भुत पुन्हा एकदा मानगुटीवर बसेल या धास्तीने गेल्या काही दिवसांपासून आशियाई शेअर बाजारात घसरण सुरू आहे. त्यामुळे याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाल्याचे आजच्या सत्रात दिसून आले.
आज शुक्रवारी शेअर बाजार सुरू होताच पहिल्या सत्रातील काही मिनीटांतच कोसळायला सुरवात झाली. आज दुपारच्या सत्रापर्यंत सेन्सेक्स तब्बल 889 अंकांनी घसरून बंद झाला. आज दिवसभरात निफ्टीमध्ये 263 अकांची तर बँक निफ्टीमध्ये 930 अंकाची घसरण झाली. शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली असून, त्यांचे कोट्यावधी रूपये बुडाले आहेत.
आयटीचे शेअर्स वधारले
एकंदरीतच ओमायक्रॉनमुळे शेअर बाजारातील प्रत्येक क्षेत्रात घसरल झाली असली तरी आजचा दिवस आयटी कंपन्यांसाठी चांगला दिसून आला. त्यामध्ये इन्फोसिस, विप्रो, एलटीआय, एचसीएल टेक सारख्या कंपन्यांमध्ये अनुक्रमे 2 ते 5 टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती.
तर दुसरीकडे एचयूएएल, मारूती, एशियन पेंट्स, अपोलो हॉस्पीटल, वेदांता, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स सारख्या कंपन्यांमध्ये 10 टक्क्यांपर्यंत घसरण झाली होती.
सलग दोन दिवस बाजारात घसरण
गुरुवारी शेवटच्या सत्रात सेन्सेक्स 319.82 अकांच्या घसरणीसह 57,581.32 वर बंद झाला होता. तर निफ्टीमध्येही जवळपास 92 अकांची घसरण झाली होती. तर आज शुक्रवारीही सेन्सेक्स तब्बल 889 अंकांनी घसरून बंद झाल्याने सलग दोन दिवस बाजारात घसरण पहायला मिळाली.
सध्या आंतरराष्ट्रीय घडामोंडीचा प्रभाव आशियातील सर्वच शेअर बाजारावर होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या शेअर बाजारात होत असलेल्या चढ-उतारामुळे रिटेल गुंतवणूकदारांचे नुकसान होवू नये यासाठी त्यांनी काळजीपुर्वक गंतवणूक करावी असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. तर अनेकजण चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घसरल्याने हिच खरी गुंतवणुकीची संधी म्हणून गुंतवणूक करत आहेत.
हेही वाचा