Latest

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ रशियात घालणार धुमाकूळ! 8 डिसेंबरला होणार प्रदर्शित

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाइन डेस्‍क : संपूर्ण भारतातील प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज' 8 डिसेंबर रोजी रशियामध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोमवारी ही घोषणा केली. रशियामध्ये आयोजित भारतीय चित्रपट महोत्सवाचा भाग म्हणून अभिनेता अल्लू अर्जुनच्या या सुपरहिट चित्रपटाचा रशियन भाषेतील प्रीमियर मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग येथे अनुक्रमे 1 आणि 3 डिसेंबर रोजी होणार आहे.

यंदाचा हा पाचवा चित्रपट महोत्सव असून 1 डिसेंबर रोजी 'पुष्पा: द राइज' चित्रपटाने त्याचे उद्घाटन होणार आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, दिग्दर्शक सुकुमार बंदरेड्डी आणि निर्माते रविशंकर मॉस्कोमधील ओशनिया शॉपिंग सेंटरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

6 डिसेंबरपर्यंत चालणारा भारतीय चित्रपट महोत्सव रशियातील 24 शहरांमध्ये आयोजित केला जाणार आहे. 'आरआरआर', 'माय नेम इज खान', 'दंगल', 'वॉर' आणि 'डिस्को डान्सर' सारखे इतर भारतीय चित्रपटही सहा दिवस चालणाऱ्या महोत्सवात दाखवले जाणार आहेत.

हेही वाचा  

SCROLL FOR NEXT