[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]
सांगली; विवेक दाभोळे : मोबाईलवरून फेक मेसेजच्या माध्यमातून आर्थिक लाभाचे आमिष दाखवून गंडा घालण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. तर याच्याच जोडीला बनावट लिंक टाकून त्यातूनही पद्धतशीर फसवणूक करण्याचे फंडे वाढू लागले आहेत. दरम्यान, अशा फसवणुकीच्या प्रकाराचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र आहे. 'फिशिंग'च्या जोडीला आता फार्मिंग, विशिंग, सेशन हॅकिंग असे नवनवे गंडा घालण्याचे फंडे सर्रास फसवणुकीसाठी वापरले जात आहेत. याचा अनेकांना मोठाच फटका बसू लागला आहे. सायबर क्राईम सेलसाठी हे 'ऑनलाईन' गुन्हे रोखण्याचे आव्हान आहे.
अॅण्ड्रॉईड मोबाईल आर्थिक फसवणुकीच्या नवनवीन प्रकारच्या गुन्ह्यांना आमंत्रण देणारे ठरू लागले आहेत. एखाद्याला विशिष्ट नंबरवरून मोबाईल मेसेज येतो की, तुम्हाला अमुकअमुक कारणांसाठी अडीच हजार रुपयांचा बोनस मंजूर झाला आहे. तो तुमच्या बँक खात्यावर जमा होण्यासाठी माहिती द्या, ओटीपी येईल, तो सांगा. यातून पॅनकार्ड, आधारकार्ड, एटीएम कार्ड क्रमांक विचारला जातो. पुढे बँक खात्याबाबतची गोपनीय माहिती काढून घेतली जाते आणि काही क्षणातच त्याच्या बँक खात्यावरून भली मोठी रक्कम काढली गेली असल्याचा त्याला 'मेसेज' येतो. असा हातोहात गंडा घातला जाण्याच्या घटना वाढत आहेत.
मध्यंतरी सोशल मीडियात एक मेसेज फिरत होत होता. यात चित्रपट, मालिका, क्रिकेट सामने मोबाईलवर पाहण्यासाठी एखाद्या कंपनीचा संदर्भ देऊन दिलेली लिंक 'क्लिक' करण्यासाठी सांगण्यात येत होते. ही लिंक क्लिक केल्यावर संबंधित व्यक्ती ज्या ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहे त्या-त्या ग्रुपवर सदरचा मेसेज पुढे पाठविला जात होता. अनेकजण या 'लिंक'च्या जाळ्यात अलगद सापडत गेले. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ही मेलिशिअस फिशिंग लिंक होती. यातून मोबाईलधारकाचा खासगी डेटा चोरला जातो.
आणखी एका सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. संबंधित व्यक्तीला एक मोबाईल मेसेज येतो. एसएमएसमध्ये एक लिंक किंवा दूरध्वनी क्रमांक असतो. त्या लिंकवर क्लिक करण्यासाठी अथवा कॉल करण्यास सांगितले जाते. अनेकवेळा एटीएम कार्ड बंद करण्यात येत आहे, ते पुन्हा सुरू करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सांगा किंवा दिलेल्या 'लिंक' वर 'क्लिक' करा असे सांगण्यात येते. यातून अनेकजण आर्थिक नुकसानीस बळी पडू लागल्या आहेत.
अनेकवेळा अॅण्ड्रॉईड मोबाईलच्या वायफायचे क्लोन बनवून खर्या वायफायचा एक नकली वायरलेस अॅॅक्सेस पॉईंट बनवून तो मूळ वायफायला कव्हर करून यातून इंटरनेटनच्या मालकाला चकवा दिला जातो. संबंधित व्यक्तीची वैयक्तिक माहिती गोळा केली जाते. यातून अनेकांना गंडा घातला गेला आहे. फिशिंग लिंकचा वापर वरून गोपनीय, खासगी, आर्थिक माहिती चोरली जाते. टेक्स्ट मेसेज, ई-मेल किंवा सोशल माध्यमातून ही लिंक पसरवली जाते.
फिशिंगचे प्रकार : ऑनलाईन फसवणुकीचे जे फंडे असतात त्यात विविध प्रकार येतात. यात खालीलप्रमाणे प्रकार आहेत.
स्मिशिंग : एसएमएसचा वापर बँकेची डिटेल्स माहिती करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. या एसएमएसमध्ये यूजर्सचा डेटा आणि एक लिंक समाविष्ट असते. त्यावर क्लिक केल्यावर यूजर्सची माहिती हॅकर्सकडे जाते.
फार्मिंग : आयपी अॅड्रेस मॉडिफाइड करुन मूळ वेबसाईटवरून खोट्या वेबसाईटवर जाण्याचा मार्ग म्हणजे फार्मिंग. अशा वेबसाईटला भेट दिली जाते तेव्हा यातून हॅकर्स माहिती चोरू शकतात.
विशिंग : ह्या प्रकारामध्ये हॅकर बँकेच्या नावाखाली कॉल करू शकतो आणि मग तुमच्याकडून डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती मागू शकतो. तुम्ही हॅकिंगचा असा प्रकार ऐकला असेल जेथे बँकेच्या नावाखाली दुसरा व्यक्ती कॉल करतो.
फिशिंग घोटाळ्यांचे प्रकार, अटॅक्स् : लॉयल्टी पॉईंट स्कॅम्स : आता विविध लॉयल्टी प्रोग्रॅम्स होत असतात. ते संपूर्णपणे सुरक्षित नसतात. फिशर्स अशी ऑनलाईन खाती सहजपणे हॅक करू शकतात.
सेशन हॅकिंग : एखाद्याच्या संगणकातील डाटा अनधिकृतपणे चोरणे हा सेशन हॅकिंगचा प्रकार आहे. कॉम्प्युटरमधील कुकीजचा वापर करुन हॅकर्स डेटा चोरू शकतात.
फिशिंग ईमेल ओळखा : आलेल्या एखाद्या ईमेलमध्ये चांगल्या ऑफर्स, सवलती दिल्या जातात. एखाद्या ईमेलमध्ये तुम्हाला सीसी ठेवले जाते. पण ज्या व्यक्तीने ईमेल पाठवला आहे, ती व्यक्ती अनोळखी असते. अशा ईमेलमधील कंटेन्ट हा धोकादायक असू शकतो. तसेच ईमेलमध्ये स्पेलिंग चुकीचे असू शकतात.
[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="true" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]