Latest

Maidaan Movie : अजय देवगणच्या ‘मैदान’च्या प्रदर्शनाला स्थगिती; जाणून घ्या कारण

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि बोनी कपूर यांच्या 'मैदान' ( Maidaan Movie ) हा चित्रपट १० एप्रिल रोजी चाहत्याच्या भेटीस येणार होता. मात्र, आता त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. दरम्यान, कर्नाटकमधील म्हैसूर न्यायालयाने 'मैदान' चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे.

संबंधित बातम्या 

म्हैसूरमधील पटकथा लेखक अनिल कुमार यांनी चित्रपट निर्मात्यांनी त्यांची पटकथा चोरल्याचा आरोप केला आहे. यानंतर कर्नाटकातील म्हैसूरच्या प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या 'मैदान' चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याचा आदेश जारी केला आहे.

बोनी कपूर आणि झी स्टुडिओज निर्मित Maidaan Movie या चित्रपटाची स्क्रिप्ट तयार केली आहे. भारताचे माजी फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. 'मैदान' हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. अमित रविंदरनाथ शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, प्रियमणी, गजराज राव, रुद्रनील घोष, मधुर मित्तल आणि इतर कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

SCROLL FOR NEXT