Latest

Hasan Mushrif : विघ्नसंतुष्टांनी निर्माण केलेल्या गैरसमजाचे निराकरण होईल : हसन मुश्रीफ

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ईडीचा तपास सुरू असल्याने आपण भाष्य करणार नाही. मात्र ईडीने छापा टाकला हे एका अर्थाने चांगल झाले. कारण काही विघ्नसंतोषी लोकांनी ईडीच्या अधिकार्‍यांच्या मनात मी स्वतः जिल्हा बँकेचा अध्यक्ष, तसेच कारखाना याबाबत जे जे गैरसमज निर्माण केले असतील त्या सगळ्याचे आता निराकरण होईल अशी मला खात्री आहे, अशा शब्दांत हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जिल्हा बँकेत आपण स्वतः व्यक्तिगत कर्जदार किंवा जामीनदारही नाही. बँकेचा अध्यक्ष म्हणून आपण कोणतीही सुविधा घेत नाही. अधिकार्‍यांच्या छाननी समितीने शिफारस केलेल्या संस्थांना बँक कर्ज देते. कंपनी किंवा फर्मना आम्ही कर्जपुरवठा करतो. बँकेचा अध्यक्ष म्हणून शिफारशीपेक्षा जादा एकही कर्ज दिले नसल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. (Hasan Mushrif )

बुधवारी ईडीच्या अधिकार्‍यांनी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि ब्रिस्क कंपनी यांच्या व्यवहारांशी संबंधित असलेल्या जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयासह दोन शाखा व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना या ठिकाणी छापा टाकल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

घोरपडे साखर कारखाना किंवा ब्रिस्क कंपनी या दोन्हीही संस्थांना योग्य पद्धतीने कर्ज दिले आहे. त्यांचे खाते एनपीए नाही. काही साखर कारखान्यांना तर 25 ते 30 वर्षांपासून कर्जपुरवठा होत आहे. जिल्हा बँक आम्ही नावलौकिकास आणली. यामध्ये शेतकरी, सहकारी संस्था, ठेवीदार, ग्राहक यांच्यासह सर्वांचा समावेश असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT