Latest

अशोक स्तंभाच्या प्रतिमेतील सिंह ‘आदमखोर आणि आक्रमक’! राज्यसभा खासदार संजय सिंह यांचे ट्विट

backup backup

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : मोदी सरकारने अशोक स्तंभाच्या प्रतिमेत बदल केला आहे. मूळ अशोक स्तंभातील सिंह हे गंभीर मुद्रेत आहेत. तर संसदेच्या नवीन इमारतीत बसविण्यात आलेल्या विशालकाय अशोक स्तंभांच्या प्रतिमेतील सिंह आदमखोर आणि आक्रमक शासकाप्रमाणे दाखवले गेले आहे, असे ट्विट आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी केले आहे.

संसद भवनाच्या नवीन विशालकाय इमारतीत नुकतेच विशालकाय अशोक स्तंभ प्रतिमेचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या प्रतिमेतील सिंहांची मुद्रा मूळ अशोकस्तंभाच्या सिंहाच्या मुद्रेपेक्षा भिन्न आहेत, असे संजय यांनी म्हटले आहे.

संजय यांच्या मतानुसार, मूळ अशोक स्तंभातील सिंह हे गंभीर मुद्रेत आहे तर आता बनवण्यात आलेल्या प्रतिमेतील सिंह आदमखोर शासकाप्रमाणे दर्शवले गेले आहे. तसेच तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार आणि महुआ मोइत्रा यांनीदेखील यावर टिप्पणी केली असून संसद भवनाच्या शीर्षस्थानी असे आक्रमक आणि अनुपातहीन समानता असलेल्या प्रतिमा स्थापित करून राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान केल्याचे आरोप केले आहे.

यावर भाजप नेता कपिल मिश्रा यांनी संजय सिंह यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. संजय यांच्या ट्विटरला उत्तर देताना त्यांच्यावर मिश्रा यांनी निशाना साधला. संजय सिंह यांनी भगवंत मान पितात ते औषध घेऊन ट्विट करू नये, तुम्हाला ते पेलत नाही. अशोक चिन्हांवरील सिंहांना आदमखोर म्हणून आपण स्वतःची उरली-सुरली आब्रु सूद्धा घालवत आहात, असे ट्विट मिश्रा यांनी केले.

वाचा संजय सिंह यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT