Latest

Brijbhushan Singh : चौकशी समितीने बृजभूषण यांना क्लीन चिट दिली नव्हती

backup backup

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Singh) यांच्याबद्दल दिल्ली पोलिसांनी आज (दि. 16) न्यायालयात (सिटी कोर्ट) एक महत्त्वाची माहिती सादर केली. दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, केंद्र सरकारने नेमलेल्या निरीक्षण समितीने बृजभूषण यांना महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपातून निर्दोष ठरवले नव्हते.

सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, 'निरीक्षण समितीने बृजभूषण शरण सिंह यांना निर्दोष ठरवले नव्हते. समितीने काही शिफारशी केल्या होत्या, निर्णय दिला नव्हता.'

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्धच्या आरोपांबाबतची शहानिशा करण्यासाठी एक निरीक्षण समिती नेमली होती. या समितीचे अध्यक्षपद भारताची बॉक्सर एम. सी. मेरी कोमकडे होते. या समितीने बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध झालेल्या लैंगिक छळाचे आरोपांची चौकशी केली.

या चौकशी समितीचा अहवाल सार्वजनिक करण्यात आला नाही. मात्र, याची एक प्रत दिल्ली पोलिसांना देण्यात आली होती. सध्या ते बृजभूषण यांच्याविरुद्धच्या आरोपांची चौकशी करत आहेत. दिल्ली पोलिस आता 23 सप्टेंबरला बृजभूषण यांच्यावरील चार्जशिटवर आपला युक्तिवाद करणार आहेत.

SCROLL FOR NEXT