Latest

पुणे: कात्रज प्राणिसंग्रहालयातील गव्याची प्रकृती गंभीर, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ अधिकार्‍यांची धावाधाव

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात गेल्या पंधरा वर्षापासून असलेल्या गव्याची प्रकृती खूपच गंभीर झाली आहे. त्याच्या उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकार्‍यांची धावाधाव सुरू आहे. जमीन धरलेल्या गव्यावर उपचार सुरू आहेत, मात्र, गवा काही केल्या उठतच नाही.

गेल्या 8 ते 9 दिवसांपुर्वी गव्याची प्रकृती अचानकच खालावली. त्याचे वजन कमी होत असल्याचे अधिकार्‍यांच्या पहाणीत समोर आले. त्यानंतर गव्याने आता जमीन धरली आहे. त्याला वाचविण्यासाठी अधिकारी वर्गाकडूनशर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील अधिकार्‍यांसह बाहेरून आलेल्या तत्ज्ञांच्या देखरेखीमध्ये उपचार सुरू आहेत. रक्त तपासणी करून गव्याला नक्की काय झाले आहे, याची तपासणी करण्यात येत आहे. परंतु, गव्याच्या आजाराचे निदान अद्यापपर्यंत झालेले नाही.

प्राणिसंग्रहालयात असलेला हा गवा 15 वर्षांचा आहे. तो चार ते पाच वर्षांचा असताना आणला होता. गव्याचे आयुर्मान साधारणत: 18 ते 20 वर्षांचे असते. त्याचे आयुर्मान अजून पुर्ण झालेले नाही. परंतु, अचानकच हा गवा आजारी पडला आहे. त्यावर उपचार सुरू आहेत.

कात्रज बागेत नुकतेच दोन गवे…

राजीव गांधी प्राणिसंग्रहालय प्रशासनाने प्राणी अदलाबदली कार्यक्रमाअंतर्गत केरळ येथील तिरूअनंतपुरम येथून नुकतेच दोन गवे आणले आहे. त्यामुळे प्राणीसंग्रहालयातील गव्यांची संख्या तीन झाली आहे. मात्र, अचानकच प्राणिसंग्रहालयात पुर्वीपासूनच असलेला गवा आजारी पडल्याने अधिकार्‍यांची चिंता वाढली आहे.

प्राणिसंग्रहालयातील एक गव्याची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर तज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निरीक्षणात उपचार सुरू आहेत. अद्याप त्याच्या आजाराचे निदान झाले नाही. मात्र, आमच्याकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
– अशोक घोरपडे, मुख्य उद्यान अधीक्षक, उद्यान विभाग, मनपा, पुणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT