Latest

नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू वर्षातील पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न | Nrusinhawadi

backup backup

नृसिंहवाडी; पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू वर्षातील पहिला दक्षिण द्वार सोहळा आज (दि. २३) दुपारी एक वाजता संपन्न झाला. अधिक महिना व रविवार यामुळे भाविकांनी स्नान तसेच दत्त दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. पावसाने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्याने कृष्णा नदीच्या पाण्यात पुन्हा वाढ झाली.

आज (दि. २३) दुपारी एक वाजता चालू वर्षातील पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला. भाविकांनी श्री गुरुदेव दत्तच्या गजरात दक्षिण द्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला. दक्षिणद्वार सोहळ्याची माहिती इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे प्रसारित झाल्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून भाविकांनी स्नान दर्शनासाठी हजेरी लावली. विशेषतः महिलांनी स्नानासाठी गर्दी केली होती. भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवसंस्थान मार्फत जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली होती.

दरम्यान श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी प .प .श्री नारायण स्वामी यांच्या मंदिरात ठेवण्यात आली आहे. या मूर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. नृसिंहवाडी व औरवाड यांना जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेला आहे. चौकट दक्षिण द्वार पर्वणी निमित्त स्नानदर्शनाचा हजारो भाविकांनी लाभ उठवला.

दक्षिण द्वार सोहळा होत असताना उत्तरेकडून कृष्णा नदीचे पाणी श्रींच्या चणकमलावरून दक्षिण द्वारात पडते. यावेळी स्नान करणे व दर्शन घेणे ही पर्वणी समजली जाते की. पर्वणी आज होणार हे समजल्यामुळे हजारो भाविक व नागरिक सकाळपासून येथे आले होते. हा पर्वणी सोहळा रविवारी (दि.२) दुपारी एक वाजता संपन्न झाला. यावेळी हजारोभाविकांनी कृष्णा नदीत स्नान तसेच दर्शनासाठी येथे गर्दी केली होती

SCROLL FOR NEXT