Latest

पुणे जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती कौतुकास्पद ! उत्तराखंडचे मंत्री डॉ. धनसिंग रावत

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : देशात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सहकार क्षेत्रातील योगदान व आर्थिक स्थिती कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्वगार उत्तराखंडचे सहकार, आरोग्य, शिक्षण मंत्री डॉ. धनसिंग रावत यांनी येथे काढले. जिल्हा बँकेस त्यांनी सोमवारी (दि.24) सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत उत्तराखंडचे राज्यसभेचे सदस्य खासदार नरेश बंसल हेसुध्दा उपस्थित होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनिल चांदेरे यांनी दोन्ही पाहुण्याचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर ते बोलत होते.

देशातील इतर जिल्हा सहकारी बँकांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आदर्श घ्यावा, असे मत बसंल यांनी यावेळी व्यक्त केले. बँकेचे प्रा.डॉ. दुर्गाडे यांनी पुणे जिल्हा बँकेच्या आर्थिक व सांपत्तिक स्थितीबाबतची माहिती दिली. सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यासाठी राज्यांमध्ये विचारांची देवाण-घेवाण करुन शेतकर्‍यांना विविध नाविन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी करण्याबाबत यावेळी संयुक्त चर्चा झाली. जिल्हा बँकेच्या कामगिरीची माहिती घेण्यासाठी उत्तराखंड राज्यातील अधिकारी भेट देण्यासाठी येणार आहेत. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुध्द देसाई यांनी आभार मानले.

SCROLL FOR NEXT