Latest

India vs Australia, 4th Test : ऑस्ट्रेलियाचा १०० धावांचा टप्पा पूर्ण

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या चौथ्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 480 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 571 धावा केल्या. भारताला 91 धावांची आघाडी मिळाली असून चौथ्या दिवसअखेरीस ऑस्ट्रेलियाने बिनबाद 3 धावा केल्या होत्या.

कुहनेमन बाद

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट 10 व्या षटकात 14 धावांवर पडली. रविचंद्रन अश्विनने मॅथ्यू कुहनेमनला पायचीत करून भारताला पहिले यश मिळवून दिले. कुहनेमनने 35 चेंडूत सहा धावा केल्या. आज पाचव्‍या दिवशी 50 षटकांच्‍या खेळानंतर ऑस्‍ट्रेलियाने 1 गडी गमावत 122 धावा केल्‍या आहेत.

चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीचे (186) रंगारंग शतक आणि अक्षर पटेलचे (79) अर्धशतक याशिवाय दोघांनी केलेल्या 162 धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे भारताने कसोटीवर पकड मिळवली आहे. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 186 धावा केल्या. त्याचवेळी शुभमन गिलने 128 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

शनिवारी विराट कोहली 59 धावांवर नाबाद होता. याचे त्याने रविवारी शतकात रुपांतर केले. या सामन्यात विराट कोहली शानदार फॉर्ममध्ये होता; परंतु अवघ्या 14 धावांनी त्याचे द्विशतक हुकले. त्याने 364 चेंडूंत 186 धावा केल्या. बर्‍याच दिवसांपासून विराट कोहलीचे कसोटीमध्ये शतक झाले नव्हते. तब्बल नोव्हेंबर 2019 नंतर विराटच्या शतकासाठी त्याचे चाहते त्याच्या शतकी खेळीसाठी आसुलेले होते. आज बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या कसोटीत त्याने दाखवून त्याने मी अजूनही 'किंग कोहली'च आहे. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील 75वे शतक असून कसोटीतील त्याचे 28 वे आहे. त्याने त्याच्या शतकी खेळीत केवळ 5 चौकारांचा समावेश असून बाकी सर्व धावा त्याने पळून काढल्या. 241 चेंडूंत शतक साजरे केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सगळ्या प्रकारात त्याचे 16 वे शतक असून कसोटीमध्ये आठवे आहे. अक्षर पटेलनेही 79 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. या डावात भारताच्या नऊ विकेटस् पडल्या, पण श्रेयस अय्यर दुखापतीमुळे फलंदाजीला येऊ शकला नाही. त्यामुळे भारताचा डाव नऊ विकेटस्वर संपला.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावांचा डोंगर उभारला. एवढे मोठे आव्हान उभे करताना त्यांच्या दोन खेळाडूंनी शतक साजरे केले. त्यात उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांचा समावेश आहे. ख्वाजाने 422 चेंडू खेळून 180 धावा चोपल्या. त्यात 21 चौकारांचाही समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त ग्रीनने 170 चेंडू खेळून 114 धावा केल्या. या धावा करताना त्याने 18 चौकार मारले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT