Latest

Ramadan : ‘देखो चांद नजर आ गया’ : पवित्र रमजान महिन्यास प्रारंभ; मंगळवारी पहिला रोजा

backup backup

सोलापूर: पुढारी वृत्तसेवा : इस्लाम धर्माचा पवित्र सण माहे रमजान म्हणून ओळखला जातो. या महिन्यात मुस्लिम बांधव अन्नपाणी न घेता निरंकार उपवास ठेवत असतात. दरम्यान, सोमवारी सायंकाळी रमजानचे चंद्रदर्शन झाले आहे. उद्या (मंगळवार दिनांक 12 मार्च) रोजी पहिला रोजा (उपवास) असल्याची माहिती शहर काझी सय्यद अमजद अली यांनी दिली.

मुस्लिम बांधव मोठ्या आतुरतेने पवित्र अशा रमजान महिन्याची वाट पाहत असतात. सोमवारी सायंकाळी मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केल्यानंतर बाहेर येऊन चंद्र पाहण्यासाठी गर्दी केली होती. अखेर चंद्रदर्शन झाले असून माहे रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे. मुस्लिम बांधवानी प्रत्यक्ष भेटून, फोनवर आणि सोशल मीडियावर रमजान महिन्याच्या चंद्र दर्शनाच्या शुभेच्छा दिल्या. सायंकाळी विविध मशिदीमध्ये तराबीची नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, रुयते हिलाल कमिटी मधील सदस्य मौलाना ताहेर बेग, मौलाना फौजदार खान, मुफ्ती अब्दुल हमीद शेख, काझी अब्दुर रफे यांनीही रमजान महिन्याच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

रमजान महिन्याचे चंद्रदर्शन झाले असून उद्या मंगळवारी रमजान चा पहिला रोजा असणार आहे. रमजान महिन्याच्या सर्वांना शुभेच्छा. मुस्लिम बांधवांनी उपवास ठेवावा. फिलिस्तीनसह ज्या ज्या ठिकाणी गरीब मुस्लिम बांधवांना अन्याय होत आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
सय्यद अमजद अली, शहर काझी, सोलापूर

रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधवांनी उपवास म्हणजेच रोजा ठेवावा. त्याचबरोबर गोरगरीब मुस्लिम बांधव, विधवा महिला यांचीही मदत करावी. जास्तीत जास्त जकात करावी.
अब्दुर राफे, शहर काझी

SCROLL FOR NEXT