Latest

Nagar News : ताहाराबादला जवानाचा मृतदेह पाण्यात आढळला

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेला जवान सुट्टीसाठी बेलकरवाडी (ताहाराबाद) ता. राहुरी येथे गावी आला होता. संबंधित जवानाचा मृतदेह गावातील एका तलावात आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर बाबासाहेब ढवळे (वय 23) असे मृत जवानाचे नाव आहे. संबंधित जवानाचा मृतदेह गावातील एका तलावात आढळल्यानंतर त्यास राहुरी येथील ग्रामिण रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते.

ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तोडमल यांनी तपासणीला येण्यापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. राहुरी पोलिस ठाण्यामध्ये संबंधित सैन्य दलातील जवान ज्ञानेश्वर ढवळे याच्या मृत्युप्रकरणी अकस्मात नोंद घेण्यात आली आहे. घटनेबाबतचा नेमका खुलासा झालेला नाही. त्यामुळे घटनेबाबत शंका- कुशंका व्यक्त केली जात आहे. पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलिस हवालदार नागरगोजे हे पुढील तपास करीत आहे. घटनास्थळ पाहणी व सविस्तर चौकशी केल्यानंतरच घटनेचा उलगडा समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT