Latest

वाहन चोरणार्‍या गुन्हेगाराला गुन्हे शाखेने केले गजाआड

अनुराधा कोरवी

पनवेल : पुढारी वृत्तसेवा :  वाहनचोरी करणार्‍या सराईताला मोटर वाहन चोरी शोध पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून तीन गुन्ह्यांची उकल झाली असून चोरीच्या चार मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. कामोठे, कळंबोली परिसरात सातत्याने वाहनचोरीच्या घटना घडत होत्या.

घडलेल्या गुन्ह्यांच्या ठिकाणी पाहणी करून तांत्रिक बाबीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात होता. यासाठी वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी उपनिरीक्षक देसाई यांचे पथक नेमले होते. सापळा रचून कैलास कदम याला ताब्यात घेण्यात आले होते. अधिक चौकशीत त्याने तीन गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून उकल झालेल्या गुन्ह्यांमध्ये दोन कामोठे तर एक कळंबोली येथील आहे.

SCROLL FOR NEXT