Latest

पुलवामा हल्ल्यातील शहीदांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही : पंतप्रधान मोदी

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली;पुढारी वृत्तसेवा: पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या ४० सैनिकांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.१४)  शहीदांना आदरांजली वाहिली. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये भीषण हल्ला घडवून आणला होता.

पुलवामामधील सैनिकांचे सर्वोच्च बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही. त्यांचे धैर्य आपल्याला मजबूत आणि विकसित भारत घडवण्यासाठी प्रेरणा देते, असेही मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.

दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये स्फोटकांनी भरलेली व्हॅन सैनिकांना घेऊन जात असलेल्या बसला धडकवली होती. काश्मीर खोऱ्यात मागील काही दशकात झालेला हा सर्वात मोठा आत्मघाती हल्ला होता. पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मदने स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने हा हल्ला केला होता. पुलवामा हल्ल्याच्या काही दिवसांतच भारताने बालकोटमधील जबा टॉपवर हवाई हल्ला करून दहशतवादी अड्डे  उद्ध्वस्त करीत बदला घेतला होता.

हेही वाचा :
SCROLL FOR NEXT