Latest

चक्क छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांच्या हातावर मारले चाबकाचे फटके (पहा व्हिडिओ)

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : राज्यातील आनंद आणि सुखसमृद्धीसाठी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी चक्क आपल्या हातावर चाबकाचे सहा फटके झेलले. प्रत्येक वर्षी मुख्यमंत्री मुख्यमंत्री भूपेश बघेल हे दूर्ग जिह्यातील जजंगिरी गावात येतात. असे प्रहार केल्याने दुष्टांचा नाश होतो, अशी येथील लोकांची धारणा आहे.

छत्तीसगढमध्ये दिवाळीचा उत्सव धूमधामपणे साजरा झाला. त्यानंतर दिवाळीच्या दुसऱ्यादिवशी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे दूर्ग जिह्यातील जजंगिरी गावात पोहचले. या ठिकाणच्या गौरागौरीचे पूजन आणि आरती केली. त्यानंतर त्यांनी राज्यातील जनतेच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली. या पूजेदरम्यान प्रथेचा भाग म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हातावर चाबकाने फटकेदेखील मारण्यात आले.

हातावर का मारतात फटके? काय आहे ही परंपरा

विरेंद्र ठाकूर या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या हातावर चाबकाने फटके मारले. छत्तीसगडच्या परंपरेनुसार, गौरा-गौरी पूजेच्या दिवशी चाबकाने मारलेल्या फटक्यांमुळे वाईट घटना टळतात, आणि राज्यात समृद्धी येते, अशी येथील लोकांची धारणा आहे. राज्याच्या समृद्धीसाठी मुख्यमंत्री दरवर्षी या लोकपंरपरेच्या उत्सवात सहभागी होत असतात.

SCROLL FOR NEXT