Latest

‘इथे’ मिळतात सर्वात स्वस्त टोमॅटो!

Arun Patil

नवी दिल्ली : सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा स्थितीत एखाद्या ठिकाणी टोमॅटो स्वस्त मिळतात म्हटलं की साहजिकच आपले लक्ष तिकडे जाऊ शकते. सध्या 40 रुपये किलो हा टोमॅटोचा भाव आपल्यासाठी स्वप्नवतच आहे. मात्र, इतक्या किमतीमध्येच टोमॅटो मिळणारे एक ठिकाण आपल्याच देशात आहे. अर्थात तिथून टोमॅटो आणायचे तुम्ही ठरवलात तर जरा लांब जावे लागेल, याचे कारण म्हणजे हे ठिकाण आसाममध्ये आहे!

सध्या अनेक शहरांमध्ये टोमॅटो 150 ते 180 रुपये किलो दराने विकले जात आहेत. काही शहरांमध्ये दर थोडेसे उतरलेही आहेत. मात्र, 40 रुपये प्रतिकिलो हा दर आपल्या ऐकिवात नव्हता. सध्या आसाममध्ये देशातील सर्वात स्वस्त टोमॅटो विक्री होत आहे. तेथील बारपेटा येथे एक किलो टोमॅटोचा भाव 40 रुपये आहे. त्यामुळे आजुबाजूच्या जिल्ह्यातील लोकही बारपेटा येथे टोमॅटो खरेदीसाठी येतात.

बारपेटानंतर सर्वात स्वस्त टोमॅटो पंजाबच्या रोपरमध्ये विकला जात आहे. रोपरमध्ये एक किलो टोमॅटोची किंमत 41 रुपये आहे. मात्र, पंजाबची राजधानी चंदिगढमध्ये आजही टोमॅटो 140 रुपये किलो दरानेच मिळतात! स्वस्त टोमॅटोच्या बाबतीत जम्मू-काश्मीर तिसर्‍या क्रमांकावर आहे. राजधानी श्रीनगरमध्ये एक किलो टोमॅटोची किंमत 63 रुपये आहे. हरियाणाच्या पंचकुलामध्ये एक किलो टोमॅटोचा भाव 90 रुपये आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT