Latest

अखेर ९२ वर्षीय वृद्धेने जिंकला ८० वर्षांचा न्यायालयीन लढा

मोहन कारंडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : कोर्टाची पायरी चढू नये असे म्हटले जाते हे खरे असले तरी दक्षिण मुंबईतील दोन घरांचा ताबा मिळविण्यासाठी सुमारे ८० वर्षे झुंज देत ९२ वर्षाच्या वृद्धेने न्यायालयीन लढाई जिंकली. या महिलेला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती आर. डी. धनुका आणि न्यायमूर्ती मिलिंद साठये यांच्या खंडपीठाने रुबी मेन्शनमधील दोन फ्लॅट्सचा ताबा मूळ मालक असलेल्या अॅलिस डिसोजा यांना दोन महिन्यात द्यावा, असे आदेश राज्य सरकारला दिले.

हे दोन फ्लॅट्स नागरी सेवा विभागातील तत्कालीन सरकारी अधिकारी असलेले डी. एस. लॉड यांना देण्यात आले होते. त्यानंतर जुलै १९४६ मध्ये हा आदेश मागे घेण्यात आला. मात्र लॉड यांच्या वारसदारांनी ताबा सोडण्यास नकार दिला. ऑगस्ट २०११ ला प्राधीकरणाने जुलै १९४६ आदेश कायम ठेवत फ्लॅट्स खाली करण्याचे निर्देष दिले. त्याविरोधात लॉड यांच्या वारसाने उच्च न्यायालयात आव्हान दिले. खंडपीठाने लॉड वारसदारांची याचिका फेटाळून लावून फ्लॅट्सचा ताबा मूळ मालक ॲलिस डिसोजा यांना देण्याचे आदेश दिले.
मेट्रो सिनेमाच्या मागील परिसरात असलेल्या रुबी मेन्शनच्या पहिल्या मजल्यावर ५०० चौरस फूट आणि ६०० चौरस असलेल्या दोन फ्लॅट्सचा ताबा मिळावा, यासाठी अॅलिस फूट क्षेत्र डिसोजा यांनी वयाच्या बाराव्या वर्षी न्यायालयीन लढा देण्यास सुरूवात केली होती. तब्बल ८० वर्षे त्या न्यायासाठी लढल्या आणि जिंकल्याही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT