Latest

शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा, नव्या युतीची ठाकरेंनी केली घोषणा (Video)

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकनाथ शिंदे गटाच्या बंडानंतर संभाजी ब्रिगेडने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. शिवसेना आणि संभाजी बिग्रेडच्या युतीची घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली. या नव्या युतीमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुकीसाठी एकत्र आलेलो नाही, आमचं हिंदुत्व पटल्याने संभाजी ब्रिगेड यांनी शिवसेनेशी युती केली आहे. आता शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येत नवा इतिहास घडवूया, असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले.

प्रादेशिक अस्मिता, संविधान टिकविण्यासाठी युती केली आहे. दुहीच्या शापाला गाडून टाकू. भाजप, संघाची विचारधारा मानत नाही, असा निशाणाही ठाकरे यांनी भाजपवर साधला. शिवप्रेमी असल्याने शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांचे रक्त एकच आहे. काही नसताना संभाजी ब्रिगेड आमच्यासोबत आल्याने लढवया सरदारांचे स्वागत करतो. दसऱ्याच्या दरम्यान महाराष्ट्रात दौरा काढणार असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

लोकशाही टिकविण्यासाठी या दोन संघटना एकत्र येणे गरजेचं आहे. महाराष्ट्रात संयुक्त मेळावे घेणार आहोत. लोकशाही संविधान धोक्यात आली आहे. आमचे आणि शिवसेनेचे ध्येय एकच आहे, असे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

SCROLL FOR NEXT