Latest

खलिस्तानी दहशतवादी पन्नूने पुन्हा ओकले विष,”अमृतसर ते अयोध्‍या…”

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : खलिस्‍तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने एक प्रक्षोभक व्हिडीओ जारी करुन पुन्‍हा एकदा भारताविरुद्ध विष ओकले आहे. 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाविरोधात तो बरगळला आहे. (Terrorist Gurpatwant Singh Pannu Provocative Video )

अमृतसर ते अयोध्या विमानतळ बंद करण्याची धमकी

22 जानेवारीपूर्वी अमृतसर ते अयोध्या विमानतळ बंद करण्याची धमकी पन्‍नूने दिली आहे. सोमवारी जारी केलेल्या प्रक्षोभक संदेशाच्या व्हिडिओमध्ये पन्नूने विशेष समुदायाला भारतापासून वेगळे असलेला उर्दिस्तान नावाचा देश तयार करण्यास सांगितले आहे. या कार्यक्रमाला विरोध करण्याची बडबड करताना तो या व्हिडीओमध्ये करताना दिसत आहे. अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्याची तयारी जोरात सुरू असता दहशतवादी पन्नूचा व्हिडिओ समोर आला आहे. (Terrorist Gurpatwant Singh Pannu Provocative Video )

मागील आठवड्यातही दिली होती शेअर मार्केट उडविण्‍याची धमकी

अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात एक लाखाहून अधिक भाविक सहभागी होणार आहेत. नुकत्याच उघडलेल्या महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाला आतापर्यंत ४० हून अधिक विनंत्या प्राप्त झाल्या आहेत. मेगा इव्हेंटदरम्यान चार्टर्ड विमाने उतरवण्यासाठी या विनंत्या प्राप्त झाल्या आहेत. पन्नूने गेल्या आठवड्यात एक व्हिडिओ देखील जारी केला होता, ज्यामध्ये तिने 12 मार्चपासून बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला लक्ष्य करून भारताचे आर्थिक नुकसान करण्याची धमकी दिली होती.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT