Latest

Terror funding case | टेरर फंडिंग प्रकरणात परवेझ झुबेर याला एटीएसकडून अटक

दीपक दि. भांदिगरे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; टेरर फंडिंग प्रकरणात (Terror funding case) राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) परवेझ झुबेर नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. एटीएसने यूएपीए (UAPA) कायद्याच्या अंतर्गत ही कारवाई केली आहे. कुख्यात मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ अनीस इब्राहिम याच्यासह पाकिस्तानातील अतिरेकी कारवायाशी संबंधित व्यक्तीशी तो सतत संपर्कात होता. तसेच तो डी गँगसाठी निधी उपलब्ध करून देत होता, असा एटीएसचा आरोप आहे. परवेझ हा अनेक दिवसांपासून फरार होता. अटकेनंतर त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. (Terror funding case)

SCROLL FOR NEXT