Latest

अंतराळातून ऐकू येतात भयाण आवाज

Arun Patil

वॉशिंग्टन : अंतराळाच्या अफाट पसार्‍यात अनेक रहस्ये दडलेली आहेत. अनेक वेळा अंतराळातून काही सिग्नल्स येत असतात तसेच काही विशिष्ट ध्वनीही रेकॉर्ड केले जात असतात. 'नासा'च्या माहितीनुसार अंतराळातून असे भयाण आवाज आतापर्यंत ऐकले गेले आहेत की ते ऐकून कुणीही भयचकीत व्हावे. इतके की घरात एकटं राहण्याचीही भीतीच वाटेल!

'नासा'ने नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक प्लेलिस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये यूजर्स अंतराळातील आवाज ऐकू शकतात. एखादा भयपट पाहताना वाजणारं पार्श्वसंगीत असतं अगदी तसे किंबहुना त्याहूनही भयाण आवाज अवकाशात होत असतात याचीच प्रचिती ही प्लेलिस्ट ऐकून येते. असे म्हणतात की अवकाशात मोठी पोकळी आहे.

ध्वनीला प्रवास करण्यासाठी लागणारे माध्यम तिथे नाही. मात्र, अंतराळात अनेक भागांमध्ये विविध वायूही आहेत, जिथं ध्वनी लहरी प्रवास करू शकतात. 'नासा'कडून सोनिफिकेशनला एका प्लेलिस्टमध्ये रूपांतरित करण्यात आलं आहे. ही संपूर्ण यादी अंतराळ संस्थेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. 'नासा'ने जारी केलेल्या या प्लेलिस्टमध्ये बुध ग्रहापासून गुरू ग्रहापर्यंतचे विविध भयाण आवाज आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT