Latest

तेंडुलकरच्या पुतळ्याचे आज वानखेडेवर अनावरण

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महान माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण बुधवारी (दि. 1) वानखेडे स्टेडियमवर केले जाणार आहे. विश्वचषक स्पर्धेंतर्गत वानखेडे स्टेडियमवर 2 नोव्हेंबरला भारताचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी पुतळा अनावरणाचा हा सोहळा होईल. त्यासाठी विक्रमवीर सचिनसह दिग्गज आजी-माजी खेळाडूंची उपस्थिती असेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी बीसीसीआय सचिव जय शहा आणि कोषाध्यक्ष आशिष शेलार यांचीही उपस्थिती असेल. सचिनचा 22 फुटांचा पुतळा प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद काळे यांनी बनवला आहे. हा पुतळा उभारण्यासाठी एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांनी पुढाकार घेतला.

SCROLL FOR NEXT