Latest

Aditya L-1 : किती उष्ण आहे सूर्य?

Arun Patil

नवी दिल्ली : 'इस्रो' 2 सप्टेंबर 2023 ला श्रीहरिकोटामधून सकाळी अकरा वाजता आपली सूर्यमोहीम 'आदित्य एल-1' लाँच करणार आहे. हे सूर्ययान पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर जाऊन सूर्याचे अध्ययन करील. त्याला सूर्याच्या उष्णतेचाही सामना करावा लागेल व त्याद़ृष्टीनेही तयारी केलेली आहे. सूर्य किती उष्ण आहे हे माहिती आहे का?

सूर्याच्या केंद्राचे तापमान सुमारे 1.50 कोटी अंश सेल्सिअस इतके आहे. सूर्याचा पृष्ठभाग फोटोस्फीयरचे तापमान 5700 अंश सेल्सिअस इतके आहे. सूर्याभोवतीच्या वायूमंडळास 'कोरोना' असे म्हटले जाते. त्याचे तापमान सूर्याच्या पृष्ठभागापेक्षाही अधिक आहे. पृथ्वी आणि सूर्यादरम्यानचे सरासरी अंतर सुमारे 15 कोटी किलोमीटरचे आहे. सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी भारताच्या 'इस्रो'कडून 'आदित्य एल1' हे यान सोडले जाणार आहे. ते पृथ्वी आणि सूर्यादरम्यानच्या 'एल1' या वैशिष्ट्यपूर्ण कक्षेत जाईल. तेथून ग्रहण वगैरेच्या अडथळ्याशिवाय ते सर्व काळ सूर्याचे निरीक्षण करू शकेल.

SCROLL FOR NEXT