Latest

तेलंगणा मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आज कोल्हापूर-सांगली दौर्‍यावर’

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज, मंगळवारी (दि. 1) कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांच्या दौर्‍यावर येत आहेत. सकाळी साडेदहा वाजता ते बेगमपेट (हैदराबाद) विमानतळावरून कोल्हापूरकडे रवाना होतील. 11 वाजून 15 मिनिटांनी त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. 11 वाजून 45 मिनिटांनी ते अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेणार आहेत.

दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी ते सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला भेट देणार आहेत. दुपारी 1 वाजता ते अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील.

दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी राव हे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या इस्लामपूर येथील निवासस्थानी भेट देतील. तेथून ते दुपारी 2 वाजता कोल्हापुरात येणार आहेत. ते यावेळी राजर्षी शाहू छत्रपतींच्या समाधिस्थळी भेट देऊन अभिवादन करणार आहेत. दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी राव हे दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा करणार आहेत. यानंतर सायंकाळी 5 वाजता ते कोल्हापूर विमानतळावरून हैदराबादकडे विमानाने रवाना होतील.

SCROLL FOR NEXT