Latest

सिंधुताई सपकाळ : ‘मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

अनाथांची माय 'सिंधुताई सपकाळ' यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या हयातीत 'सिंधुताई सपकाळ' यांच्या जीवनावर मराठी चित्रपट रिलीज झाला होता- 'Mee Sindhutai Sapkal.' मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने त्यांची भूमिका साकारली होती. तेजस्विनीची ही भूमिकाही कौतुकास पात्र ठरली होती. आता अचानक माई निघून गेल्या आणि तेजस्विनीच्या काही क्षण पायातली ताकदच गेली. तिने माईंचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. तिने एक मोठी पोस्ट लिहिलीय. ही पोस्ट लिहिण्याची मन:स्थिती नव्हती असे तिने म्हटलं आहे.

तेजस्विनीने इन्स्टाग्रामवर लिहिलंय-

अनेक लोकांनी विचारलं तू अजून कसं काही लिहिलं नाहीस…पोस्ट नाही केलं? पटकन judge करतो ना आपण त्यांच्या social media वरुन माणसाला? पण कुटुंबातल्या माणसांना घरातलं कुणी गेल्यावर social media वर पोस्ट करण्याची मनःस्थिति आणि वेळ खरंच असतो?! माझीही काहीशी अशीच अवस्था झाली. रात्री ममता ताईच्या ph वरुन बातमी confirm झाल्यावर काही क्षण पायातली ताकदच गेली. थक्क झाले होते. खूप वेळ ph वाजत होता. प्रतिक्रियेसाठी. काही जड छातीने उचलले, काही नाही उचलता आले….कारण ती वेळ खरंच नाजूक होती.

माई आणि मी रोज संपर्कात होतो का तर नाही….पण तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊन जाते, की तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि ह्यात त्यांचा हातभार आहे ह्याचं त्यांना भान ही नसतं. चित्रपटानंतर काही वेळा त्यांना भेटण्याचा योग आला….कधीच कुणाला नावाने हाक न मारता "बाळा" म्हणणार्‍या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या. मला चित्रपट बघून कायम म्हणायच्या "मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस !

"अभिनेत्री" म्हणून, एक तेजस्विनी पंडित आहे बरंका इथे अशी ओळख मला मी सिंधुताई सपकाळ ह्या चित्रपटाने दिली. अनेक आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कार आम्ही पटकावले.

अभिमान वाटतो की ज्या कलाक्षेत्रात मी काम करते , त्यातून माईंचं हे महान कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा खारी चा का असेना पण मला वाटा उचलता आला.

आणि एक व्यक्ति म्हणून त्यांचा तो अविस्मरणीय प्रवास मी screen वर जगू शकले त्यातून बरेच काही शिकू शकले ह्याचा आनंद आहे. परकाया प्रवेश म्हणतात ना तेच ! कळत नकळत खूप काही दिलं तुम्ही मला माई.

महाराष्ट्र तुमच्या जाण्याने पोरका झाला…! पण माझ्यासाठी तुम्ही जिवंतच असाल. आणि तुमच्यावर आधारित असलेला चित्रपट तुमच्या लढवय्या वृत्तीची, तुमच्या संघर्षाची ग्वाही, प्रेरणा माझ्या रूपी देत राहील.

लोकहो एक विनंती….

घाई घाई ने RIP लिहिण्याच्या ह्या जगात त्यांचंही एक कुटुंब आहे (आणि ते खूप मोठं आहे) ते अत्यंत अवघड परिस्थितीतून जात आहे ह्याचा आपल्याला विसर पडण्याची शक्यता आहे… त्यांना वेळ द्या. Let them atleast have some time to mourn on a family members death.

तब्येत बरी नसल्यामुळे उद्या त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जाता येणार नाही पण ईश्वर चरणी प्रार्थना- माईंच्या आत्म्यास शांती लाभो. आणि ममता ताई, दीपक दादा, ममता बाल सदन च्या कुटुंबाला ह्या अवघड परिस्थितीशी लढण्याची ताकद देवो.
ओम शांती.
माई….?

– तुमचीच चिंधी, सिंधुताई आणि माई

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT