Latest

Tejashri Pradhan : शुभ्रा म्हणते-फार काही सुचलं नाही, पण…

स्वालिया न. शिकलगार

तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) ही अग्गंबाई सासुबाई या मालितून घराघरात पोहोचली. या मालिकेतील तिचं शुभ्रा हे पात्र गाजलं. आजही चाहते तिला शुभ्रा नावानेचं ओळखतात. म्हणूनचं तिला कमेंट देखील शुभ्रा या नावानेचं केल्या जातात. असाच एक नवे फोटोशूट तिने केले. या फोटोलादेखील शुभ्रावरूनचं कमेंट दिल्या जात आहेत. tejashri pradhan हिने नवे फोटोशूट केलंय. या फोटोशूटमध्ये तिचा मेकअप अगदी साधा दिसत असला तरी ती खूपचं सुंदर दिसतेय.

हे फोटोज तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. याला फोटो कॅप्शन देत तिने म्हटलंय-सत्यापित

??? suggest a caption ??? P.s. फार काही सुचलं नाही .. पण photos post करायचे होते ? so post केले. #HappyLife एका कॅफेमध्ये तिने हा फोटोशूट केलाय. शशांक साने याची फोटोग्राफी आहे. तिने मोकेळ केस सोडले आहेत. ही हेअरस्टाईल निशी गोडबोलेने केलीय.

तिच्या या फोटोला भरभरून कमेंट येत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. एखा नेटकऱ्याने तिला कमेंट दिलीय की-❤️❤️❤️❤️ P.s chi kay garcha nahi post cha khup god keli ahe ????????????❤️.

दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलंय-Sakhre hun pan khub goad aahe aamchi Teju. तिसऱ्या युजरने लिहिलंय-❤️ सुंदर तिचा स्वभाव हास्य तिची ओळख…❤️

Happiness is wearing❤️, Ohhhh that dress and you !! ❤️❤️❤️, looking soooo beautiful?✨, Life Is Beautiful When You Are Happy Inside….So, Choose To Be Happy!!?, FABULOUS looookkkkk sss… Tejashri….?????❤️❤️❤️ अशा एकापेक्षा एक खूप सुंदर कमेंट तिला दिल्या जात आहेत.

दरम्यान, तेजश्री नव्या प्रोजेक्टमध्य़े बिझी असल्याचं समजतयं. या भाऊबीजेला भावा-बहिणीच्या नात्याला अधोरेखित करणारा लघुपट 'कशा असतात ह्या बायका'भेटीला आला आहे.

तेजश्री आणि अभिजीत खांडकेकर दोघे एकत्र या लघुपटात आहेत. कोटा फॅक्टरी फेम अभिनेता मयुर मोरे याचंदेखील मराठीत पदार्पण झालंय. tejashripradhanfc या इन्स्टाग्रामर लघुपटाची एक झलक दाखवण्यात आलीय.

या व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये लिहिलीय की-भावा बहिणीच्या नात्यातले, नाजूक पदर उलगडणारी, एकमेकांना समजून घेत, एकमेकांच्या पाठीशी समर्थपणे उभी राहणारी ही नव्या जमान्यातील भावा बहिणीची जोडी… आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीची सर्व पातळ्यांवर लढण्याची, आणि नाती जपण्याची सक्षमता दाखविणारी एक छोटीशी गोष्ट!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.